E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
दिशा सालियन प्रकरणावरुन विधिमंडळात गदारोळ
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
मुंबई
: पाच वर्षांपूर्वीचे दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर विधिमंडळात या प्रकरणाचे गुरूवारी जोरदार पडसाद उमटले. सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेची व प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याने विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. संसदीय कामकाय मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या गोंधळाबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, भाजप व शिंदेसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत सालियन प्रकरण लावून धरले. दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असून उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची चौकशी करून कारवाई करु, असे आश्वासन दिले.
सभागृहातील वाद वैयक्तिक पातळीवर येणे म्हणजे नळावरची भांडणे आहेत का? अवघा महाराष्ट्र हे पाहत आहे. सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी येत आहेत. ते काय म्हणत असतील, असे सांगत त्यांनी सभागृहाच्या कामकाजाविषयी चिंता व्यक्त केली. सभागृहाच्या नियमित कामकाजात प्रश्नोत्तरे संपताच ‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’व्दारे डॉ. मनीषा कायंदे यांनी दिशा सालियन प्रकरण सभागृहाच्या निर्शनास आणले होते.
खोटेनाटे आरोप कराल तर पस्तावाल : उद्धव
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील, असा इशारा दिला. तर, आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयात जो अर्ज दाखल झाला आहे त्याला न्यायालयात उत्तर देऊ. तुम्ही हवी ती चौकशी करा.
Related
Articles
जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलाचा घात
22 Mar 2025
आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक
23 Mar 2025
लठ्ठ खासदारांनी आरोग्य तपासणी करावी : केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
22 Mar 2025
सेन्सेक्स सातव्या दिवशीही ७८ हजारावर १
26 Mar 2025
सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करणार
26 Mar 2025
विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार
23 Mar 2025
जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलाचा घात
22 Mar 2025
आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक
23 Mar 2025
लठ्ठ खासदारांनी आरोग्य तपासणी करावी : केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
22 Mar 2025
सेन्सेक्स सातव्या दिवशीही ७८ हजारावर १
26 Mar 2025
सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करणार
26 Mar 2025
विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार
23 Mar 2025
जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलाचा घात
22 Mar 2025
आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक
23 Mar 2025
लठ्ठ खासदारांनी आरोग्य तपासणी करावी : केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
22 Mar 2025
सेन्सेक्स सातव्या दिवशीही ७८ हजारावर १
26 Mar 2025
सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करणार
26 Mar 2025
विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार
23 Mar 2025
जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलाचा घात
22 Mar 2025
आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक
23 Mar 2025
लठ्ठ खासदारांनी आरोग्य तपासणी करावी : केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
22 Mar 2025
सेन्सेक्स सातव्या दिवशीही ७८ हजारावर १
26 Mar 2025
सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करणार
26 Mar 2025
विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार
23 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
दुधाची दरवाढ (अग्रलेख)
5
’वैशाली’च्या मालकाच्या जावयास अटक
6
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)